Jump to content

वडापाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबईतला अतिशय लोकप्रिय वडा पाव

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).

इतिहास

वडा-पावचा वडा पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.

थोडक्यात कृती

वडा-पाव
वडा-पाव तळताना

ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव.[निःसंदिग्धीकरण आवश्यक]


वडा करण्याची सर्वसाधारण कृती:

उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढीलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात.
सोनेरी रंग झाला की वडे तयार झाले असे समजावे. वडे कढईतून काढताना अतिरिक्त तेल नितळू द्यावे. स्वछ टीप कागदावर वडे काढल्यास अतिरिक्त तेल कागदात शोषले जाते.
पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे

दिल्लीतील वडा पाव

हा क्रम फक्त नावानुसार आहे

बाह्य दुवे