Jump to content

अविनाश साबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अविनाश साबळे
२०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये धावताना अविनाश साबळे
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १३ सप्टेंबर १९९४
जन्मस्थान मांडवा, आष्टी, जिल्हा बीड, महाराष्ट्र, भारत
खेळ
देश भारत
खेळ मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार ३००० मीटर स्टीपलचेज
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ८:१६:२१ (नॅशनल रेकॉर्ड) , ग्रँड पिक्स-२ , ३००० मीटर स्टीपलचेज-पुरुष

अविनाश साबळे (जन्म: १३ सप्टेंबर, १९९४) हे ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारतीय खेळाडू आहेत.[ संदर्भ हवा ]

पटियाळा येथे फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. अविनाशने ३ हजार मीटर स्टीपलचेस ( steeplechase )मध्ये राष्ट्रीय विक्रमासह पदक मिळवले. त्याने ७ मिनिटे २०.२० सेकंदात नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे याआधीचा विक्रम २०१९ साली अविनाशच्या नावावर होता. तेव्हा त्याने २१.३७ सेकंदात हे अंतर पार केले होते.

याआधी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. इतकेच नव्हे तर जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत आहे. १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला.

अविनाश साबळे याने रविवारी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने ही शर्यत 1.00.30 सेपंद अशी पूर्ण करीत हिंदुस्थानसाठी नव्या राष्ट्रीय विक्रमावर मोहोर उमटवली. तोक्यो ऑलिम्पिकसाठी 3 हजार मीटर अडथळा शर्यतीचे तिकीट बुक करणारा अविनाश साबळे 61 मिनिटांच्या आतमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा भारतातील पहिलाच धावपटू ठरलाय हे विशेष.

महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने याआधी 1.03.46 सेपंद अशा वेळेसह हाफ मॅरेथॉन पूर्ण करीत भारतातील विक्रम नोंदवला होता, पण अविनाश साबळे याने या शर्यतीत हा विक्रम मागे टाकला.

संदर्भ

[संपादन]