Jump to content

कंदहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंदहार (पश्तो:کندهار‎ ) हे अफगाणिस्तानातील मोठे शहर आहे. हे शहर वस्तीमानानुसार अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कंदहार याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.

याची स्थापना इ.स.पू. ३२९मध्ये झाली. त्यावेळी या शहराला अलेक्झांड्रिया अराकोसिया असे नाव होते. हे नाव अलेक्झांडर द ग्रेटच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले गेले होते.