Jump to content

"वडापाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:


==थोडक्यात कृती==
==थोडक्यात कृती==
ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: [[वडा]] आणि [[पाव]]. वडा करण्याची सर्वसाधारण कृती: उकडलेला [[बटाटा|बटाटा]] कुस्करुन, त्यात [[हिरवी मिरची]], [[कोथिंबीर]], [[आले]], [[लसूण]], [[हळद]], [[कढीलिंब]], वगैरे मिसळून, त्याला [[हिंग]]-[[मोहरी|मोहरीची ]]फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या [[हरबरा|चण्याच्या]] पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात. पाव सहसा घरात न बनवता [[बेकरी|बेकरीमधून]] आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.
ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: [[वडा]] आणि [[पाव]]. वडा करण्याची सर्वसाधारण कृती: उकडलेला [[बटाटा|बटाटा]] कुस्करुन, त्यात [[मिरची]], [[कोथिंबीर]], [[आले]], [[लसूण]], [[हळद]], [[कढीलिंब]], वगैरे मिसळून, त्याला [[हिंग]]-[[मोहरी|मोहरीची ]]फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या [[हरबरा|चण्याच्या]] पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात. पाव सहसा घरात न बनवता [[बेकरी|बेकरीमधून]] आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.


==वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे==
==वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे==

०८:०४, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

चित्र:Vadapav.jpg

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).

इतिहास

वडा-पावचा वडा पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.

थोडक्यात कृती

ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव. वडा करण्याची सर्वसाधारण कृती: उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढीलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात. पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे

हा क्रम फक्त नावानुसार आहे